रायगड मधील पेशवेकालीन ऐतिहासिक वीरेश्वर मंदिरात मोठी चोरी; ४० लाख रुपये किमतीच्या वस्तू गायब
मुंबईजवळच्या रायगड जिल्ह्यातील खोपोली येथील ऐतिहासिक वीरेश्वर मंदिरात मोठी चोरीची घटना घडली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून श्वान पथके, तांत्रिक तपास आणि विशेष पथकांच्या मदतीने आरोपींचा शोध सुरू केला आहे. अशी माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार रायगड जिल्ह्यातील वरची खोपोली येथील ऐतिहासिक आणि पेशवेकालीन श्री वीरेश्वर मंदिरात सुमारे ४० लाख रुपये किमतीचे १७ किलो वजनाचे चांदीचे आच्छादन पिंड व कळस चोरीला गेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या धाडसी संपूर्ण जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. माहितीनुसार आंतरराष्ट्रीय बाजारात वस्तूंचे मूल्य सुमारे ४० लाख रुपये असल्याचा अंदाज आहे. ही संपूर्ण घटना मंदिरात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये कैद झाली आहे. खोपोली पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्यांचा शोध सुरू केला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, ही चोरी शनिवार आणि रविवार रात्रीच्या दरम्यान झाली. रविवारी पहाटे जेव्हा पुजारी आणि मंदिराचे सेवक नेहमीप्रमाणे दरवाजे उघडण्यासाठी आले, तेव्हा ही घटना उघडकीस आली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी मंदिरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून तपास सुरू केला. फुटेजमध्ये रात्री दोन मुखवटाधारी व्यक्ती मंदिराच्या मागच्या दारातून आत शिरताना दिसले. आरोपींना ओळखण्यासाठी आणि अटक करण्यासाठी पोलीस श्वान पथक, तांत्रिक तपास आणि स्थानिक माहितीदारांची मदत घेत असल्याचे पोलिसांनी सांगितले. अनेक विशेष पथकेही तैनात करण्यात आली आहे.
ALSO READ: भाजप आमदारच्या काफिल्यातील कारचा भीषण अपघात
Edited By- Dhanashri Naik

