1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
  4. There are indications that the preparations for the Assembly and Lok Sabha elections have started

विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांची तयारी सुरू झाल्याचे संकेत मिळत आहेत

दोन महिन्यांत पुढील विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांची तयारी सुरू झाल्याचे संकेत मिळत आहेत. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे सध्या बारामती दौऱ्यावर असून यावेळी त्यांनी भाजपा पुढील विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्राच चांगली कामगिरी करण्याच्या दृष्टीने संघटनात्मक उभारणीवर लक्ष केंद्रीत करत असल्याचं सांगितलं.
 
यावेळी बोलताना चंद्रशेखर बावनकुळेंनी भाजपाचं २०२४च्या विधानसभा निवडणुकांमध्ये ४५हून जास्त जागा निवडून आणण्याचं लक्ष्य असेल, असा निर्धार व्यक्त केला. “महाराष्ट्रात ४५ हून अधिक लोकसभा जागा आणि २०० हून अधिक विधानसभेच्या जागा आमच्या युतीच्या बळावर आम्ही निवडून आणू. जनता ही विश्वासघात करणाऱ्यांना बाजूला करेल आणि जे खरे हिंदुत्वाचं रक्षण करणारे कार्यकर्ते आहेत, त्यांना जनता मदत करेल ही आम्हाला अपेक्षा आहे”, असं बावनकुळे यावेळी म्हणाले.
पुढील लेख
उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात आलेला हा दुरावा कमी होणार