मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 6 सप्टेंबर 2022 (14:46 IST)

उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात आलेला हा दुरावा कमी होणार

eknath uddhav
खरी शिवसेना कोण? यासंबंधी निर्णय झालेला नाही. सुप्रीम कोर्टातील दाखल याचिकांवर निर्णय प्रलंबित असून, निवडणूक आयोगानेही अद्याप कोणता निर्णय दिलेला नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडून त्यांच्यावर सतत टीका आणि आरोप होत आहेत. एकनाथ शिंदेंनीही त्यांच्या टीकेला अनेकदा प्रत्युत्तर दिलं आहे. यामुळे भविष्यात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात आलेला हा दुरावा कमी होणार का? अशी विचारणा केली असता एकनाथ शिंदे यांनी यावर उत्तर दिलं आहे.
एकनाथ शिंदे यांनी ‘एबीपी माझा’शी संवाद साधला. यावेळी त्यांना भविष्यात उद्धव ठाकरे आणि तुम्ही एकत्र येणार का? असं विचारण्यात आलं असता ते म्हणाले “आज आम्ही ज्या मार्गाने चाललो आहोत, तिथे बाळासाहेबांचे विचार, राज्याचा सर्वांगीण विकास याकडे लक्ष आहे. जनतेच्या मनातील सरकार आम्ही स्थापन केलं आहे. ज्या ठिकाणी आम्ही जातो तिथे लोकांच्या चेहऱ्यावर वेगळं पहायला मिळत आहे. याचा अर्थ त्यांनी सरकारला मान्यता दिली आहे. लहान मुलं, राजकारणाशी संबंध नसणारे तुमचं पाऊल राज्याच्या हिताचं आहे असं सांगतात. त्यामुळे टीका करणाऱ्यांना त्यांच्या भाषेत उत्तर देण्यापेक्षा, कामातून उत्तर देऊ हा माझा स्वभाव आहे”.