शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 6 सप्टेंबर 2022 (09:04 IST)

याच कारणातून बंडखोरी झाली, एकनाथ शिंदे यांनी दिलं असं उत्तर

eknath shinde
बंडखोरीचा विचार मनात कसा आला? असं विचारलं असता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिलं आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर सत्ता स्थापन करण्यास सेनेच्या आमदारांचा सुरुवातीपासून विरोध होता. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचं खच्चीकरण केलं जात होते, याच कारणातून बंडखोरी झाली असं उत्तर एकनाथ शिंदे यांनी दिलं आहे. ते एका वृत्तवाहिनीशी संवाद साधत होते.
 
यावेळी आता बंडखोरी केली पाहिजे, हा विचार मनात कधी आणि कसा आला? असं विचारलं असताना एकनाथ शिंदे म्हणाले, “खरं म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर सत्ता स्थापन करणं आम्हाला आधीपासून मान्य नव्हतं. सेनेच्या आमदारांनाही मान्य नव्हतं, जनतेलाही मान्य नव्हतं. आम्ही पक्षाचा आदेश मानणारे कार्यकर्ते आहोत. त्यावेळी नेतृत्वाचा निर्णय झाला, आम्ही एकत्र काम करू लागलो. पण तेव्हाही आमदारांची याला मान्यता नव्हती.”
 
“सुरुवातीपासूनच आमचा याला विरोध होता. शिवसेनेला त्रास होत होता, कार्यकर्त्यांचं खच्चीकरण केलं जात होतं. मविआ सरकारमधील काही घटक पक्षातील नेते आमच्याच आमदारांच्या मतदारसंघात जाऊन भूमीपूजन आणि उद्घाटनं करत होते. जो उमेदवार पराभूत झालाय, त्याला हाताशी धरून हे सर्व सुरू होतं. शिवसेनेची गळचेपी होत होती. बाळासाहेबांचे आणि हिंदुत्वाचे विचार यांचीही सरमिसळ होत होती, यातूनच हा निर्णय झाला” अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.