गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 7 मार्च 2019 (10:41 IST)

एक जवान शहीद होतो त्यावेळीकोणाला राग येत नाही

मुंबईतील लालबागच्या राजा सार्वजनीक गणेशोत्सव मंडळातर्फे पुलवामा दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबाला प्रत्येकी 5 लाख रुपये आर्थिक मदत देण्यात आली. यामध्ये 7 ऑगस्ट 2018 रोजी काश्मीरमध्ये शहीद झालेले मेजर कौस्तुभ राणे यांची वीर पत्नी कनिका राणे यांनाही आर्थिक मदत देण्यात आली.
 
यावेळी मनोगत व्यक्तं करताना वीरपत्नी कनिका राणे यांनी सांगितले की, 'जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या पुलवामा दहशतवादी हल्ल्यामध्ये तब्बल 40 जवान शहीद झाले. म्हणून भारतीय लोकांना राग आला. पण जेव्हा एक जवान शहीद होतो त्यावेळी मात्र कोणाला राग येत नाही' असं खडे बोल या वीर पत्नी कनिका राणे यांनी बोलून दाखवले.
 
'मुंबईत मी एका अधिकाऱ्यांकडे गेले होते. त्यावेळी मी त्यांना मी माझी ओळख करून दिली. त्यावेळी त्यांनी सांगितलं की, वो मीरा रोड में हुवा था वो, सब बडे-बडे फूल लगे थे' हे असं ऐकल्यावर आम्हाला काय वाटत असेल याचा कोणी विचार केला का? आपल्याच शहरातील लोकांना त्यांच्याच शहरातील शहीदाची माहिती नाही. काय बोलावं यांना' असंही त्या म्हणाल्या.