मंगळवार, 31 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 7 मार्च 2019 (08:37 IST)

डासांमुळे विमानाला झाला उशीर

मुंबईहून दिल्लीला जाणाऱ्या एका विमानात  डास एवढ्या प्रमाणात होते की प्रवाशांना त्याचा त्रास होऊ लागला. त्यामुळे याची माहिती प्रवाशांनी कर्मचाऱ्यांना दिली. त्यानंतर डास मारण्याचे औषध फवारण्यात आले. तरिही डास काही कमी झाले नाहीत. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी चक्क डास मारण्याची इलेक्ट्रिक रॅकेट हाती घेऊन विमानात प्रवेश केला. दुसरीकडे डास मारण्याच्या मोहिमेला एवढा वेळ लागला की हे विमान एक तास उशिरा आकाशात झेपावले.