गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

भारताने पाकचा F16 लढाऊ विमान पाडला, भारताचा एक पायलट बेपत्ता

पाकिस्तानी जेटने बुधवारी जम्मू-काश्मिरच्या पुंछ आणि नौशेरा सेक्टरमध्ये भारतीय वायू क्षेत्राचे उल्लंघन केले परंतू भारतीय विमानांनी त्यांना प्रत्युत्तर देत पाडले. भारताने पाकिस्तानचा एक विमान पाडला.
 
एअर व्हाइस मार्शल आरजीके कपूर यांनी म्हटले की भारताने पाकिस्तानचा एक विमान पाडला जेव्हाकि भारताचा एक मिग 21 विमान कोसळले असून या विमानातील पायलट बेपत्ता आहे.
 
भारतीय हवाई दलाचे अधिकारी आर जी के कपूर आणि परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. त्यांनी म्हटले की भारतीय वायुसेनेने परराष्ट्र मंत्रालयच्या पुराव्याच्या आधारावर कारवाई केली. तसेच पाकिस्तानच्या दाव्याची पडताळणी सुरू आहे.