शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By

जर सोनं हरवले तर समजा तुमचा हा ग्रह खराब आहे

जेव्हा तुम्ही एखाद्या ज्योतिषीकडे जाल तेव्हा तुम्हाला पत्रिकेची गरज पडते, पण बर्‍याच वेळा असे ही होते की तुमची पत्रिकाच नसते. कोणी ही तुमचे बीना वेळ आणि तिथीचे पत्रिका तयार करू शकत नाही. अशा परिस्थितीत कसे समजेल की तुमच्यावर कोणत्या ग्रहांचा कुप्रभाव सुरू आहे, पण काही लक्षण असे ही असतात ज्यांचा सरळ संबंध एखाद्या खास योग किंवा ग्रहाशी असतो. याच्या माध्यमाने तुम्ही या ग्रहाची शांती करून याचे सकारात्मक परिणाम मिळवू शकता.  
 
जर तुम्हाला अचानक धन हानी व्हायला लागेल. तुमचे रुपये हरवले, घरात बरकत नसेल, दमा किंवा श्वासाचा आजार होईल. त्वचा संबंधी रोग होतील. कर्ज उतरत नसेल. एखाद्या कागदावर चुकीने सही केल्याने नुकसान होईल तर समजावे की तुमच्यावर बुध ग्रहाचा कुप्रभाव सुरू आहे. तुम्ही बुधवारी किन्नरांना हिरवे वस्त्र दान करा आणि गायीला हिरवा चारा खाऊ घाला. तुम्हाला बुध ग्रहाकडून थोडे आराम मिळेल.  
 
जर मोठे लोक तुमच्याशी सारखे नाराज राहत असतील. सांधे दुखीचा त्रास होत असेल. शरीरात लठ्ठपणा वाढत असेल. झोप कमी येत असेल. लिहिण्यात वाचण्यात अडचण येत असेल. एखाद्या ब्राह्मणाशी विवाद झाला असेल किंवा कावीळ रोग झाला तर समजावे की गुरुचा अशुभ प्रभाव तुमच्यावर पडत आहे. अशा स्थितीत केशराचा टीका रविवारपासून लावणे सुरू करून २७ दिवसापर्यंत रोज तो लावावा. सामान्य अशुभता दूर होण्यास मदत मिळेल, पण गंभीर परिस्थिती जसे नोकरी जाणे किंवा मुलावर संकट येणे, सोनं चांदी हरवणे तर बृहस्पतीच्या बीज मंत्रांचा जप करावा. यामुळे परिस्थितीत थोडे आराम मिळेल.