मंगळवार, 19 मार्च 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: बुधवार, 16 जानेवारी 2019 (00:45 IST)

Swapna Jyotish- चार प्रकारचे असतात स्वप्न

सामान्य प्रकारे सर्वांनाच स्वप्न येतात. मग ते लहान मुलं असो किंवा वृद्ध.  स्वप्न येणे एक स्वाभाविक प्रक्रिया आहे, पण आमच्या समाजात स्वप्नांबद्दल बरीच मान्यता आहे. असे मानले जाते की स्वप्न आम्हाला भविष्यात होणार्‍या घटनांबद्दल सूचित करतात.   
 
काही स्वप्नांचे शुभ फळ मिळतात तर काहींचे अशुभ. स्वप्न ज्योतिष्यानुसार स्वप्न चार प्रकारचे असतात - पहिला दैविक, दुसरा शुभ, तिसरा अशुभ आणि चवथा  मिश्रित. हे सर्व भविष्यात होणार्‍या चांगले वाईट घटनांबद्दल आम्हाला सांगतात. काही स्वप्न लवकर पूर्ण होतात तर काही उशीरा.  
जाणून घ्या स्वप्नांबद्दल काही खास गोष्टी  -
1. दैविक व शुभ स्वप्न कार्य सिद्धी अर्थात कामात यश मिळवण्याची सूचना देतात.  
 
2. अशुभ स्वप्न कार्य नाही होण्याची सूचना देतात आणि मिश्रित स्वप्न मिश्रित फलदायक असतात.  
 
3. स्वप्न ज्योतिष्यानुसार रात्रीच्या पहिल्या टप्प्यात बघण्यात आलेल्या स्वप्नांचे फळ एका वर्षाच्या आत मिळतात. तसेच दुसर्‍या टप्प्यात बघण्यात आलेले स्वप्नांचे फळ सहा महिन्यात मिळतात.  
 
4. तिसर्‍या टप्प्यात बघण्यात आलेल्या स्वप्नांचे फळ तीन महिन्यात मिळतात आणि चवथ्या टप्प्यात पाहिलेल्या स्वप्नांचे फळ लगेचच मिळतात.  
 
5. वाईट स्वप्न बघून जर रात्रीच कोणाला सांगितले तर त्या स्वप्नाचे फळ नष्ट होऊन जातात किंवा सकाळी उठून महादेवाला नमस्कार करून तुळशीच्या झाडाला जल चढवले तर वाईट स्वप्नांचे फळ नष्ट होऊन जातात.   
 
6. रात्री झोपण्याअगोदर विष्णू, शंकर, महर्षी अगस्त्य आणि कपिल मुनी यांचे स्मरण केल्याने वाईट स्वप्न येत नाही.