रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : सोमवार, 17 जून 2024 (09:35 IST)

महाराष्ट्रात खळबळ उडाली! मोबाईल द्वारे EVM हॅक केल्याचा दावा

Facebook
शिवसेनेचे शिंदे गटाचे खासदार रवींद्र वायकर लोकसभा निवडणुकीत उत्तर पश्चिम मतदारसंघातून उभे असून केवळ 48 मतांनी ते जिंकले.या वरून बराच वाद झाला.निवडणुकीच्या दिवशी गोरेगाव निवडणूक केंद्रावर मोबाईल बंदी असताना मोबाईलचा वापर केल्या प्रकरणी रवींद्र वायकर यांचे नातेवाईक मंगेश पंडिलकर यांच्यासह निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यावर मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, निवडणूक आयोगाचे अधिकारी गौरव यांच्याकडे एक मोबाईल फोन होता ज्याद्वारे मतमोजणी दरम्यान एक ओटीपी तयार होतो आणि हा मोबाईल वाईकरांचे नातेवाईक पंडिलकर वापरत होते. पहाटेपासून दुपारी 4 वाजे पर्यंत मोबाईलचा वापर केल्याचा पोलिसांना संशय आहे. 
 
निवडणूक आयोगाकडे सर्व सीसीटीव्ही फुटेज असून, ते आता या प्रकरणाचा तपास करणाऱ्या मुंबई पोलिसांना देण्यात आले आहेत. 

या प्रकरणाचा तपास लावण्यासाठी मुंबई पोलिसांनी तीन पथके तयार केली असून पोलीस तपासात सीसीटीव्ही फुटेज तपासणार आहे. मोबाईल फोन जप्त करण्यात आला आहे.पोलिस फोनचा सीडीआर घेऊन मोबाईल क्रमांकाची सर्व माहिती गोळा करत आहेत. सध्या पोलीस त्याचा तपास करत असून आता मोबाईलच्या फॉरेन्सिक रिपोर्टची प्रतीक्षा आहे.  
 
या घटनेबाबत काँग्रेसने सोशल मीडियावर पोस्टही केली आहे. काँग्रेसने ट्विटरवर लिहिले की, 'ईव्हीएमशी संबंधित एक गंभीर बाब समोर आली आहे. मुंबईत एनडीएचे उमेदवार रवींद्र वायकर यांच्या नातेवाईकाचा मोबाईल फोन ईव्हीएमशी जोडण्यात आला होता. अशा स्थितीत एनडीएच्या उमेदवाराच्या नातेवाईकाचा मोबाईल ईव्हीएमशी का जोडला गेला? मतमोजणी सुरू असलेल्या ठिकाणी मोबाईल फोन कसा पोहोचला?  शंका निर्माण करणारे अनेक प्रश्न आहेत निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण द्यावे. 
 
Edited by - Priya Dixit