मंगळवार, 5 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : मंगळवार, 27 सप्टेंबर 2022 (22:16 IST)

धनुष्यबाणासाठी निवडणूक होणार

shivsena
ज्यांच्याकडे सर्वाधिक नेते, उपनेते, आमदार, खासदार, सचिव, जिल्हा संपर्क प्रमुख तसंच विभाग प्रमुख असतील, त्यांनाच खरी शिवसेना म्हणून मान्यता दिली जाऊ शकते. या गोष्टींच्या सुनावणीची प्रक्रिया फारच किचकट
असल्यामुळे निवडणूक आयोगाचा निर्णय येईपर्यंत शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह गोठवलंही जाऊ शकतं. शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह गोठवण्यात आलं तर मात्र ठाकरे गट आणि शिंदे गट यांना निवडणुका वेगळ्या चिन्हावर लढवाव्या लागू शकतात
 
  सर्वोच्च न्यायालयाने शिवसेनेच्या निवडणूक चिन्हावरील सुनावणीवरील स्थगिती उठवली  व आजच्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला खरी शिवसेना कोण हे सांगितले यासंदर्भात कार्यवाही सुरू करण्यास परवानगी दिली.