मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 29 जून 2022 (21:03 IST)

48 तासांत काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडणार

flood
येत्या 48 तासांत काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडणार असून यावेळी किनारपट्टीच्या भागात सोसाट्याचा वारा वाहणार आहे, असा अंदाज ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ कृष्णकांत होसाळीकर यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, मुंबईत उद्याही आकाश ढगाळ राहणार असून मध्यम स्वरूपाच्या सरी बरसतील. मात्र, उपनगरात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे, असा अंदाज कुलाबा वेधशाळेने वर्तवला आहे.
 
मुंबईसह राज्यात पावसाने ओढ दिली असल्यामुळे ग्रामीण भागात पेरण्यांना उशीर झाला आहे. या पेरण्या जुलै महिन्यापासून सुरू कराव्यात, असे आवाहन आधीच करण्यात आले आहे. त्याचबरोबर मुंबईसह राज्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठा कमी होऊ लागला असताना मुंबईसह राज्यात बुधवारी पावसाने काही ठिकाणी जोरदार हजेरी लावली. मुंबईत सकाळपासून ढगाळ वातावरण होते. अधूनमधून मध्यम आणि जोरदार सरी कोसळल्या. मात्र, दुपारनंतर पाऊस थांबला. मात्र, अधूनमधून लहान सरी कोसळत होत्या.
 
मराठवाडा, विदर्भात मेघगर्जनेसह पाऊस
मुंबईसह कोकण, गोवा येथे पुढील 48 तासांत मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आला आहे. त्याचबरोबर मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे तर काही ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.