उद्धव ठाकरे : ‘माझ्या लोकांनीच मला दगा दिला’,म्हणत ठाकरे सरकारने घेतले 'हे' 10 मोठे निर्णय

Last Modified बुधवार, 29 जून 2022 (20:10 IST)
बुधवारी संध्याकाळी झालेल्या कॅबिनेटमध्ये उद्धव ठाकरे यांनी सर्वांचे आभार मानले आहेत. माझ्या पक्षातल्या लोकांनीच मला दगा दिला असं ते बोलले आहेत. अशी माहिती जयंत पाटील यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकनंतर पत्रकारांशी बोलताना दिली आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आलेला आहे. त्यावर कोर्टात निर्णय अपेक्षित असताना उद्धव ठाकरे सरकारनं मंत्रिमंडळाच्या बैठकीत औरंगाबाद आणि उस्मानाबाद या दोन जिल्ह्यांची नावं बदलण्याचा निर्णय घेतला आहे.

त्याबरोबरच ठाकरे सरकारनं मंत्रिमंडळाच्या बैठकीत 10 मोठे निर्णय घेतले -

औरंगाबाद शहराच्या 'संभाजीनगर' नामांतरासह मान्यता
उस्मानाबाद शहराच्या 'धाराशीव' नामांतरासह मान्यता
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे लोकनेते स्वर्गीय दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ या नामकरणास मान्यता
राज्यासाठी हळद संशोधन व प्रक्रिया धोरण लागू करणार. हिंगोली जिल्ह्यात मा. बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (हळद) संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र स्थापन करणार.
कर्जत (जि. अहमदनगर) येथे दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) न्यायालय स्थापन करणार.
अहमदनगर - बीड - परळी वैजनाथ या नवीन रेल्वे मार्ग प्रकल्पाच्या सुधारित खर्चास मान्यता व त्यासाठी राज्य शासनाचा हिस्सा देणार.
ग्रामीण भागातील विशेष मागास प्रवर्ग आणि इतर मागास प्रवर्गासाठी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले घरकुल योजना राबवणार.
विदर्भ विकास मंडळ, मराठवाडा विकास मंडळ व उर्वरित महाराष्ट्र विकास मंडळ ही विकास मंडळे पुनर्गठीत करण्याचा निर्णय.
निवड झालेल्या परंतु मराठा आरक्षण रद्द झाल्याने नियुक्ती न मिळालेल्या एसईबीसी उमेदवारांकरिता अधिसंख्य पदे निर्माण करण्यासाठी विधेयक मांडण्याचा निर्णय.
शासन अधिसूचना 8 मार्च 2019 अनुसार आकारावयाच्या अधिमुल्याची रक्कम भरण्याच्या कालावधीस मुदतवाढ देण्याचा निर्णय.
काँग्रेस नेते आणि मंत्री सुनील केदार मंत्रिमंडळ बैठकीनंतर म्हणाले की, "कामाचा कुठलाही अनुभव नसताना अडीच वर्षं सगळ्यांनी सहाकार्य केलं. पुढेसुद्धा ते थांबणार नाहीत. त्यांनी आयुष्यात थांबणं शिकलंच नाही, असंही उद्धवजी म्हणाले. आमचे त्यांनी आभार मानले. मुळात कुणीही काही चांगलं केलं की आपण आभार मानतोच ना."
"स्पाईन सर्जरी झाल्यानंतर महिन्याभरात काम सुरू करणारी दुसरी व्यक्ती दाखवा. एक तरी नाव सांगा. पण उद्धवजींनी काम सुरू केलं. अशा माणसासोबत कटकारस्थान होणार असेल, तर महाराष्ट्राची 12 कोटी जनता विचार करणार आहे की नाही, हे मला माध्यमांनी सांगावं," असंही सुनील केदार म्हणाले.


यावर अधिक वाचा :

हुपरीत आढळली एलियन्ससारखी दिसणारी अळी

हुपरीत आढळली एलियन्ससारखी दिसणारी अळी
निसर्ग आपल्या अचंबित करणार्‍या आविष्कारांनी मानवाला नेहमीच विचार करावयास लावतो. संपूर्ण ...

Video विमानाखाली कार घुसली, IGI विमानतळावर मोठा अपघात टळला

Video विमानाखाली कार घुसली, IGI विमानतळावर मोठा अपघात टळला
नवी दिल्ली- राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मंगळवारी ...

पनवेलमध्ये मनसेला खिंडार, 100 पदाधिकाऱ्याचा शिंदे गटात ...

पनवेलमध्ये मनसेला खिंडार, 100 पदाधिकाऱ्याचा शिंदे गटात प्रवेश
शिवसेनेनंतर शिंदे गटाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मनसेला खिंडार पाडले आहे. शिंदे ...

संजय राऊत यांच्या मुंबईतील दोन ठिकाणी छापे

संजय राऊत यांच्या मुंबईतील दोन ठिकाणी छापे
शिवसेना खासदार संजय राऊत यांना सक्तवसुली संचालनालयाने अटक केल्यानंतर त्यांच्या संबंधित ...

सुप्रिया सुळे म्हणतात आम्ही सर्व कुटुंब या लढ्यामध्ये एकत्र ...

सुप्रिया सुळे म्हणतात आम्ही सर्व कुटुंब या लढ्यामध्ये एकत्र आहोत
शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते तथा खासदार संजय राऊत यांना ईडीने अटक केली. राष्ट्रवादी पक्षाचे ...

विनायक मेटेंचा अपघात नेमका कसा झाला? पोलिसांनी दिली माहिती

विनायक मेटेंचा अपघात नेमका कसा झाला? पोलिसांनी दिली माहिती
शिवसंग्राम पक्षाचे प्रमुख विनायक मेटेंचं अपघाती निधन झालं आहे. विनायक मेटे यांच्या गाडीला ...

Salman Rushdie: सलमान रश्दी यांच्या प्रकृतीत सुधारणा, ...

Salman Rushdie:  सलमान रश्दी यांच्या प्रकृतीत सुधारणा, व्हेंटिलेटरच्या सपोर्टवरून काढण्यात आले
प्रसिद्ध लेखक सलमान रश्दी यांच्या प्रकृतीत आता सुधारणा होत आहे. एका कार्यक्रमादरम्यान ...

राकेश झुनझुनवाला कोण होते? त्यांना शेअर मार्केटमधील 'पारस' ...

राकेश झुनझुनवाला कोण होते? त्यांना शेअर मार्केटमधील 'पारस' का म्हणायचे?
शेअर मार्केटमधील सर्वांत मोठे गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांचे आज (14 ऑगस्ट) निधन झालं. ...

विनायक मेटे : मराठा आरक्षणासाठी आग्रही नेता ते 25 वर्षं ...

विनायक मेटे : मराठा आरक्षणासाठी आग्रही नेता ते 25 वर्षं विधानपरिषदेची आमदारकी
शिवसंग्राम पक्षाचे प्रमुख विनायक मेटेंच्या गाडीला अपघात झाल्यानंतर त्यांचं निधन झालं आहे. ...

Rain Update :या जिल्ह्यांत मुसळधार पाऊस कोसळणार

Rain Update :या जिल्ह्यांत मुसळधार पाऊस कोसळणार
सध्या राज्यात विविध भागात पावसाची दमदार हजेरी सुरु आहे. राज्यात या जिल्ह्यात मुसळधार ...