1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 29 जून 2022 (15:02 IST)

राज्यपालांनी बोलवले विधीमंडळाचे विशेष अधिवेशन; ठाकरे सरकारची अग्नीपरीक्षा उद्याच

bhagat singh koshyari uddhav
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी अखेर राज्य विधीमंडळाचे विशेष अधिवेशन बोलविण्याचे फर्मान काढले आहे. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी काल रात्री राज्यपालांची भेट घेतली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार अल्पमतात असल्याचे फडणवीस यांनी राज्यपालांना सांगितले. राज्य सरकारला बहुमत चाचणी सिद्ध करण्यास सांगावे, अशी विनंती फडणवीस यांच्यासह भाजप शिष्टमंडळाने राज्यपालांकडे पत्राद्वारे केली. त्याची दखल तत्काळ राज्यपालांनी घेतली. त्यानुसार, आज सकाळीच राज्यपालांनी एक फर्मान काढले आहे.  विधीमंडळाच्या सचिवांना हे पक्ष देण्यात आले आहे. त्यात नमूद केले आहे की, गुरुवार, ३० जून रोजी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलविण्यात यावे. या अधिवेशनात महाविकास आघाडी सरकारने त्यांचे बहुमत सिद्ध करावे. सकाळी ११ वाजता हे अधिवेशन सुरू होईल आणि सायंकाळी ५ वाजता बहुमत चाचणी घेण्यात यावी, असे राज्यपालांनी निर्देशित केले आहे. त्यामुळे ठाकरे सरकारचे काऊंटडाऊन सुरू झाले आहे.