शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 15 डिसेंबर 2022 (22:10 IST)

हे मुंबई विकत आहेत! : आदित्य ठाकरे

Aditya Thackeray
ज्या जागेवर अॅक्वेरिअम, मोकळ्या जागा आणि अर्बन फॉरेस्ट करणार होतो, तीच जागा सरकारने बिल्डरच्या घशात घालण्याचा डाव रचलाय, असा आरोप शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी केला आहे.  त्यांनी याबाबत ट्विट करत ही माहिती दिली.
 
आदित्य ठाकरे ट्विटमध्ये म्हणतात की, माझ्या ऐकण्यात येतंय की, वरळी डेअरीच्या जागेवर जिथे आम्ही मुंबईकरांसाठी ॲक्वेरियम, मोकळ्या जागा आणि अर्बन फॉरेस्ट करणार होतो ते रद्द करत, खोके सरकारने समिती स्थापन  करून हा भूखंड बिल्डरच्या घश्यात घालण्याचा डाव रचलाय! आमच्यावरचा राग मुंबईवर काढला जातोय, हे मुंबई विकत आहेत!
Edited by : Ratnadeep Ranshoor