1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
  4. third rank to lokmanya tilak jhanki

महाराष्ट्राच्या चित्ररथाला तिसरा क्रमांक

प्रजासत्ताक दिनी राजपथावर पार पडलेल्या संचलनात सहभागी झालेल्या महाराष्ट्राच्या चित्ररथाने तिसरा क्रमांक पटकावला आहे. अरूणाचल प्रदेशच्या चित्ररथाने पहिले स्थान मिळवले असून त्रिपुराच्या चित्ररथाला दुसरा क्रमांक मिळाला आहे.

या संचलनात महाराष्ट्रासह १७ राज्यांचे व केंद्रीय मंत्रालयांचे सहा असे एकंदर २३ चित्ररथ सहभागी झाले होते. या चित्ररथात लोकमान्यांच्या जीवनकार्याचा वेध घेण्यात आला.  या चित्ररथाची संकल्पना प्रसिद्ध कलादिग्दर्शक चंद्रशेखर मोरेमांडली असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली ४० कलाकारांनी हा चित्ररथ उभारला होता.
पुढील लेख
एसटी महामंडळ तिकीटासाठी डेबिट, क्रेडिट कार्ड स्वाइप करणार