1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 3 जुलै 2021 (16:08 IST)

अनिल देशमुख यांना तिसरा समन्स

ईडीने अनिल देशमुख यांना तिसरा समन्स पाठवण्यात आला आहे. ५ जुलै रोजी ईडी समोर चौकशीला राहण्याचे आदेश या पूर्वीच्या दोन समन्समध्ये देण्यात आले होते. या अगोदर दोन वेळा पाठवण्यात आलेल्या समन्सना देशमुखांनी आपल्या वकीला मार्फत उत्तर दिले आहे. कायदेशीर सल्ला घेण्यासाठी आणि सुप्रीम कोर्टात याचिका करण्यासाठी अनिल देशमुख दिल्लीला रवाना झाले आहेत. 
 
ईडीकडून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना दोनदा समन्स बजावला होता. त्यांनी ऑफिसमध्ये जाणं टाळलं आहे पण आपण ईडीला सहकार्य करत असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. त्याबाबत त्यांनी ट्वीट देखील केले आहे.
 
अनिल देशमुख यांनी त्यांच्या विरोधात सीबीआयने दाखल केलेला गुन्हा रद्द करावा या मागणीसाठी याचिका केली आहे. यावेळी अनिल देशमुख यांचे वकील अमित देसाई यानी युक्तिवाद केला. मात्र, त्यांचा युक्तिवाद पूर्ण झाला नाही. त्यामुळे देशमुख यांच्या याचिकेवर आता सोमवारी 5 जुलै रोजी सुनावणी होणार आहे.