1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
  4. This company will not charge for RT-PCR testing beyond this age

ही कंपनी घेणार नाही या वयापुढील RT-PCR चचणीचे पैसे

company
कोरोनाची लागण झालेली आहे किंवा नाही याची खात्री देणाऱ्या RT-PCR या चाचणीबाबत नाशिक येथील दातार कॅन्सर जेनेटिक्सने मोठी घोषणा केली आहे. यापुढे ६० वर्षे वयापुढील नागरिकांकडून या चाचणीचे कुठलेही शुल्क दातार जेनेटिक्स घेणार नाही. म्हणजेच, ६० वर्षे वयापुढील नागरिकांसाठी ही चाचणी मोफत असणार आहे. 
 
नाशिक शहरातील तीन संकलन केंद्रांवर ही सुविधा दातार जेनेटिक्सने उपलब्ध करुन दिली आहे. त्यात गंगापूर रोडवरील श्री गुरुजी रुग्णालय, अंबड औद्योगिक वसाहतीतील एफ ७, डी रोड आणि त्र्यंबक रोड वरील आयटीआय या संकलन केंद्रांचा समावेश आहे. सद्यस्थितीत या चाचणीसाठी ८०० ते ८५० रुपये आकारले जातात. मात्र, आता ही चाचणी ज्येष्ठांना मोफत असणार आहे.
पुढील लेख
टोपे यांनी केंद्र सरकारकडे केल्या काही महत्त्वाच्या मागण्या