1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 12 मे 2021 (11:31 IST)

कुविख्यात डॉन छोटा राजनला रुग्णालयातून डिस्चार्ज

Notorious Don
कुविख्यात डॉन छोटा राजन उर्फ राजन निकाळजे याचा ७ मेला दुपारी दिल्लीतील एम्स रुग्णालयात कोरोनाने मृत्यू झाल्याचे वृत्त आले व सोशल मीडियावर त्याचीच चर्चा सुरू झाली होती. मात्र त्याचे निधन झाले नसून तो जिवंत असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत, असा खुलासा एम्स रुग्णालयाने केला होता.  त्यानंतर १६ दिवसांनी छोटा राजनने कोरोनावर मात केली आहे. राजनला एम्स रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.   
 
एकेकाळी आंतरराष्ट्रीय डॉन दाऊद इब्राहिमचा अत्यंत विश्वासू साथीदार असलेला छोटा राजन १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोट मालिकेनंतर दाऊद टोळीतून फुटून बाहेर पडला होता. दुबईतून पलायन केल्यानंतर तो अनेक देशांत लपूनछपून वास्तव्यास होता. त्याही काळात तो मुंबईतील अंडरवर्ल्डमध्ये सक्रीय होता. आपल्या हस्तकांमार्फत त्याने मुंबईत अनेक गुन्हे केल्याचा आरोप आहे. मुंबई बॉम्बस्फोटातील अनेक आरोपींची हत्या करून त्याने आपण देशभक्त डॉन असल्याचा दावा केला होता.