शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: शनिवार, 24 एप्रिल 2021 (09:07 IST)

नव्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या अधिक, 74,045 जणांना डिस्चार्ज 66,836 नवे रुग्ण

राज्यात नव्या रुग्णापेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. शुक्रवारी 74 हजार 045 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला तर, 66 हजार 836 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली. राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांपैकी 34 लाख 04 हजार 792 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
 
आरोग्य विभागाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 41 लाख 61 हजार 676 वर जाऊन पोहोचली आहे. सध्या राज्यात 6 लाख 91 हजार 851 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. देशातील सर्वाधिक सक्रिय रुग्ण महाराष्ट्रात आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 81.81 टक्के एवढं झाले आहे.
 
 773 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला, आजवर एकूण 63 हजार 252 जण कोरोनामुक्त मुत्यूमुखी पडले आहेत. राज्याचा कोरोना मृत्यूदर 1.52 टक्के एवढा आहे.
 
सध्या राज्यात 41 लाख 88 हजार 266 जण होम क्वारंटाईन आहेत तर, 29 हजार 378 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. राज्यात आतापर्यंत 2 कोटी 51 लाख 73 हजार 596 नमूने तपासण्यात आले आहेत.