1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 17 एप्रिल 2021 (08:24 IST)

लॉकडाऊनचा कोणताही परिणाम दिसेना! राज्यात ६३, ७२९ नव्या रुग्णांची नोंद

No lockdown results
राज्यात कडक  संचारबंदी लागू करून दोन दिवस पूर्ण झाले असून मात्र अनेक ठिकाणी लोकांची गर्दी पाहायला मिळत आहे. दररोज ६० हजारांहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळत आहेत. 
 
शुक्रवारी राज्यात ६३ हजार ७२९ नवे कोरोनाबाधित आढळले आहेत, तर  ३९८ कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे आता राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ३७ लाख ३ हजार ५८४वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ५९ हजार ५५१ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच  दिवसभरात ४५ हजार ३३५ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत तर राज्यात आतापर्यंत एकूण ३० लाख ४ हजार ३९१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण  ८१.१२ टक्के एवढे झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.६१ टक्के एवढा आहे.
 
नोंद झालेल्या एकूण ३९८ मृत्यूंपैकी २३४ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ११० मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ५४ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ५४ मृत्यू, पुणे- १७, बुलढाणा- ९, नाशिक- ७, नागपूर- ६, अहमदनगर- ४, जळगाव- ४, नांदेड- ३, ठाणे- ३ आणि लातूर- १ असे आहेत.  तपासण्यात आलेल्या २ कोटी ३३ लाख ८ हजार ८७८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ३७ लाख ३ हजार ५८४ (१५.८९ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३५ लाख १४ हजार १८१ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २५ हजार १६८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात अद्याप ६ लाख ३८ हजार ३४ हजार रुग्णांवर सुरू आहेत.