मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: शनिवार, 10 एप्रिल 2021 (08:27 IST)

राज्यात ‘कोरोना’ची स्थिती चिंताजनक ! 58 हजार 993 नवीन रुग्ण, 301 जणांचा मृत्यू, पुण्यात 1 लाखाहून अधिक अ‍ॅक्टिव्ह रुग्ण

राज्यात कोरोना संसर्गाचा उद्रेक पहायला मिळत आहे. दररोज मोठ्या संख्येने कोरोनाबाधित आढळून येत आहेत. शिवाय, रुग्णांच्या मृत्यूंच्या संख्येतही मोठी वाढ होत आहे. राज्यात शुक्रवारी नव्या कोरोना बाधित रुग्णांच्या आकड्यात कालच्या तुलनेत थोडी वाढ झाली असून राज्याची स्थिती चिंताजनक आहे. राज्यात कोरोना रुग्णांचा आकडा सातत्याने वाढत चालला आहे. राज्यात गेल्या 24 तासात राज्यात 58 हजार 993 नव्या रुग्णांची नोंद झाली असून 301 रुग्णांना जीव गमवावा लागला आहे. तर काल राज्यात 56 हजार रुग्ण आढळून आले होते आणि 376 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता.
 
राज्यात 45 हजार 391 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले आहे. आजपर्यंत 26 लाख 95 हजार 148 रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण घटत चालले आहे. सध्या राज्यामध्ये कोरोना बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 81.96 टक्के आहे. रुग्ण वाढत असताना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. आज राज्यात 301 रुग्णांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत 57 हजार 329 जणांना जीव गमवावा लागला आहे. राज्यात रुग्ण मृत्यू होण्याचे प्रमाण 1.74 टक्के आहे.
 
सध्या राज्यामध्ये 5 लाख 34 हजार 603 रुग्ण अ‍ॅक्टिव्ह आहेत. राज्यात सर्वाधिक अ‍ॅक्टिव्ह रुग्ण पुण्यात आहेत पुण्यात 1लाख 051अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 2 कोटी 16 लाख 31 हजार 258 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 32 लाख 88 हजार 540 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण 15.2 टक्के आहे. सध्या राज्यात 26 लाख 95 हजार 065 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत. तर 24 हजार 157 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
 
राज्यातील प्रमुख शहरातील अ‍ॅक्टिव्ह रुग्ण
 
देशामध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात पुण्यात सर्वाधिक 1 लाख 51, मुंबई 88053, ठाणे 67479, नाशिक 36019, औरंगाबाद 16920, नांदेड 12540, नागपूर 63036, जळगाव 8581, अहमदनगर 16287, बुलढाणा 9956, लातूर 10129 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत.