गुरूवार, 28 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 8 एप्रिल 2021 (14:44 IST)

कोरोनाने मेलेली माणसं जगण्यासाठी लायक नव्हती: भिडेंचे वादग्रस्त वक्तव्य

Corona's dead man was not fit to live: Controversial statement by the crowd
मास्क लावण्याची मुळीच गरज नाही, हा सगळा मूर्खपणा आहे, कोणत्याही शहाण्याने हा सिद्धांत काढला असे वादग्रस्त वक्तव्य करत शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे पुन्हा चर्चेत आले आहे. त्यांनी म्हटलं की कोरानामुळे मेलेली माणसं जगण्यासाठी लायक नव्हती.
 
मुळात कोरोना हा रोग नाही आणि कोरोनाने जी माणसं मरतात ती जगायला लायक नाहीत. हा ... वृत्तीच्या लोकांना होणारा रोग आहे. मानसिक रोग आहे. याने काही होत नाही. असे वादग्रस्त वक्तव्य भिडे यांनी केले.
 
भिडे म्हणाले की लॉकडाउनची गरज नाही कारण त्यामुळे व्यसन वाढत आहेत. शिक्षण क्षेत्र उध्वस्त होत आहे. कोरानाला केंद्र आणि राज्य सरकार जबाबदार आहेत. कोरोना बावळट रोग आहे. त्यांनी म्हटलं की दारुची दुकानं उघडी असून त्यांना परवानगी दिली आहे. पण कोणी काही विकत बसला आहे त्याला पोलीस काठ्या मारतात. काय चावटपणा आहे. हा नालायकपणा, मूर्खपणा चालला आहे.