शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मुंबई , गुरूवार, 8 एप्रिल 2021 (07:52 IST)

दहावी-बारावीच्या परीक्षा ऑफलाइनच : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा

दहावी आणि बारावीनंतर विद्यार्थ्यांचे पुढील शैक्षणिक मार्ग वेगवेगळे असल्याने या परीक्षा ऑफलाइन पद्धतीनेच घेण्याचा शिक्षण विभागाने निर्णय घेतला आहे. यासंदर्भातील निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बैठकीत घेण्यात आला.
 
राज्यात सोवारपासून जाहीर केलेल्या कडक निर्बंधांमुळे दहावी, बारावीच्या परीक्षांबाबत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. यासंदर्भात परीक्षांचा आढावा घेण्यासाठी मंगळवारी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड व शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकार्यां्ची महत्त्वपूर्ण बैठक झाली होती. या बैठकीत मुख्यमंत्रीच्या परीक्षेबाबतचा निर्णय घेतील, असा निर्णय झाला होता. कोरोना रुग्ण वाढले तर काय उपाययोजना कराव्या लागतील व परीक्षांसदर्भातील निर्णय कसे घ्यावे लागतील यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मंत्रिमंडळाला शिक्षण विभागाच्या अधिकार्यांनी प्रेझेंटेशन दिले. यानंतर निर्णय जाहीर केला गेला.
 
दहावीच्या परीक्षेला सुमारे 17 लाख, तर बारावीच्या परीक्षेला 15 लाख विद्यार्थी बसणार आहेत. दहावीची लेखी परीक्षा 29 एप्रिल ते 20 मे, तर बारावीची लेखी परीक्षा 23 एप्रिल ते 21 मे याकालावधीत होणार आहे. यामुळे दोन आठवड्याचा कालावधी या परीक्षेला आहे. दरम्यान कोरोनाची परिस्थिती आणि रुग्णसंख्या यावर सर्व अवलंबून होते. परंतु महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावी आणि बारावीच लेखी परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेण्याचाच निर्णय झाला आहे.