शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: शुक्रवार, 9 एप्रिल 2021 (08:38 IST)

राज्यात ‘कोरोना’ कहर ! गेल्या 24 तासात 56 हजार 286 नवीन रुग्ण, 376 जणांचा मृत्यू

राज्यात कोरोना संसर्गाचा उद्रेक पहायला मिळत आहे. दररोज मोठ्या संख्येने कोरोनाबाधित आढळून येत आहेत. शिवाय, रुग्णांच्या मृत्यूंच्या संख्येतही मोठी वाढ होत आहे. राज्यात कोरोना संसर्ग वेगाने पसरत असल्याने आरोग्य यंत्रणेवर ताण पडत आहे. राज्यात कोरोना रुग्णांचा आकडा सातत्याने वाढत चालला आहे. राज्यातील कोरोना परिस्थितीमुळं कठोर निर्बंध लागू केले आहेत. मात्र राज्यातील कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. राज्यात  राज्यात ५६ हजार २८६ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. बुधवारच्या तुलनेत हा आकडा कमी झालेला दिसला. राज्यात 36 हजार 130 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले आहे. आजपर्यंत 26 लाख 49 हजार 757 रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण घटत चालले आहे. सध्या राज्यामध्ये कोरोना बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 82.5 टक्के आहे. रुग्ण वाढत असताना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. राज्यात 376 रुग्णांचा मृत्यू झाला असून आजपर्यंत 57 हजार 028 जणांना जीव गमवावा लागला आहे. राज्यात रुग्ण मृत्यू होण्याचे प्रमाण 1.77 टक्के आहे.
 
सध्या राज्यामध्ये 5 लाख 21 हजार 317 रुग्ण अ‍ॅक्टिव्ह आहेत. राज्यात सर्वाधिक अ‍ॅक्टिव्ह रुग्ण पुण्यात आहेत पुण्यात 97 हजार 242 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 2 कोटी 13 लाख 85 हजार 551 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 32 लाख 29 हजार 547 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण 15.10 टक्के आहे. सध्या राज्यात 27 लाख 02 हजार 613 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत. तर 22 हजार 661 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
 
राज्यातील प्रमुख शहरातील अ‍ॅक्टिव्ह रुग्ण
देशामध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात पुण्यात सर्वाधिक 97242, मुंबई 83693, ठाणे 69993, नाशिक 34919, औरंगाबाद 18082, नांदेड 11659, नागपूर 61711, जळगाव 8212, अहमदनगर 15292, बुलढाणा 9620, लातूर 9355 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत.