गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 28 डिसेंबर 2021 (21:51 IST)

'ही' निवडणूक आता फेब्रुवारीत होणार

विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राज्यपालांनी पत्र पाठवत ट्विस्ट आणल्यानंतर या अधिवेशनात होणारी विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक महाविकास आघाडी सरकारला रद्द करावी लागली आहे. मात्र ही निवडणूक आता फेब्रुवारीत होणार असल्याची माहिती नाना पटोले यांनी दिली आहे. 
 
ही निवडणूक फेब्रुवारीत होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात घेण्याचा निर्णय घेतला आहे. अशी माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे. नाना पटोले यांनी अध्यक्षपद सोडल्यानंतर गेल्या अनेक महिन्यांपासून विधानसभा अध्यक्षांची निवड होणे बाकी आहे. 
 
राज्यपालांचं मत डावलून निवडणूक घेतल्यास त्यांच्याकडून तीव्र प्रतिक्रिया उमटू शकते. राष्ट्रपती राजवटीही लावल्या जाऊ शकते. त्यामुळे ही निवडणूक घेऊ नका, असं आघाडीतील काही नेत्यांचं म्हणणं पडलं. त्यामुळेही घटनात्मक पेचप्रसंग आणि राष्ट्रपती राजवटीची बला टाळण्यासाठी आघाडीने दोन पावलं मागे जाण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं.