संतोष परब हल्लाप्रकरणी उद्या पुन्हा सुनावणी
संतोष परब हल्लाप्रकरणावरून शिवसेनेने भाजपा आमदार नितेश राणे यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतलेली आहे. शिवाय, नितेश राणेंना अटक व्हावी अशी देखील मागणी करण्यात आली असून, तशी पोलीसात तक्रार देखील दाखल केली गेली आहे. तर, नितेश राणे यांच्या अटकपूर्व जामिनाबाबत न्यायालयात निर्णय होऊ शकला नाही. त्यामुळे आता उद्या पुन्हा सुनावणी होणार आहे.
मंगळवारी जवळपास पाच ते सहा तास सुनावणी झाली आणि त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयाने उद्यावर सुनावणी ढकलली आहे. न्यायालयाच्या कामकाजाची वेळ संपल्यामुळे ही सुनावणी उद्या होणार आहे. त्यामुळे नितेश राणेंना जामीन मिळणार की नाही? याचा निर्णय उद्याच होणार आहे.