शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 26 मे 2020 (16:44 IST)

'ही' पक्षाची अधिकृत भूमिका नाही : मुनगंटीवार

“नारायण राणे यांनी केलेली राष्ट्रपती राजवटीची मागणी ही भाजपची अधिकृत भूमिका किंवा मागणी नाही,” असं भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केलं. “ नारायण राणेंची राष्ट्रपती राजवटीची मागणी ही पक्षाची अधिकृत भूमिका नाही. अशाप्रकारची मागणी भाजपानं केलेली नाही. ती त्यांची वैयक्तीक मागणी आहे,” असं माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले.
 
करोना संकटाचा सामना करण्यास ठाकरे सरकार सपशेल अपयशी ठरलं आहे. या सरकारला नारळ देऊन राष्ट्रपती राजवट लागू करा असं ते म्हणाले होते. त्यानंतर राज्यातील राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. परंतु ही मागणी पक्षाची अधिकृत भूमिका नसून त्यांची वैयक्तिक भूमिका असल्याची माहिती माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.