शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: शनिवार, 11 एप्रिल 2020 (16:04 IST)

नगरसेवकाने केली वाढदिवसानिमित्त जंगी पार्टी, गुन्हा दाखल

लॉकडाऊनमध्ये पनवेलमधील एका नगरसेवकाने आपल्या वाढदिवसानिमित्त जंगी पार्टी केली आहे.  भाजप नगरसेवक अजय बहिरा यांनी आपल्या मित्रांना वाढदिवसानिमित्त पार्टी आयोजित केली. या प्रकरणी भाजप नगरसेवकासह त्याच्या ११ साथीदारांवर गुन्हा दाखल झाला आहे. पनवेल शहर पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. दरम्यान, पोलिसांनी अजय बहिरा यांनी अटक केली असून जामीनावर त्यांची सुटकादेखील करण्यात आली आहे. 
 
अजय बहिरा हे पनवेलमधील प्रभाग क्रमांक २० चे भाजप नगरसेवक आहेत. अजय बहिरा यांनी स्वत:च्या घरी वाढदिवसाची पार्टी आयोजित केली होती. ते राहत असलेल्या इमारतीच्या गच्चीवर मित्रांसोबत सेलिब्रेशन करत होते. पार्टी सुरू असताना पोलिसांनी अचानक धाड टाकली. त्यावेळी तिथे ११ जण उपस्थित होते. त्यांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले नव्हते. त्या सर्वांविरोध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. जमावबंदी असताना एकत्र येणे, मास्क न घालणे इत्यादी गुन्हे त्यांच्यावर दाखल केले आहेत.