शुक्रवार, 15 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: जळगाव , शुक्रवार, 3 एप्रिल 2020 (13:00 IST)

जळगावात कोरोनाचा पहिला बळी; 63 वर्षीय रुग्णाचा मृत्यू

Corona's first victim
जिल्हा रुग्णालयात एक कोरोना संशयित रुग्ण पॉझिटिव्ह असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली होती. या रुग्णाचा गुरुवारी दुपारी अडीच वाजता उपचारादरमन मृत्यू झाला. ही माहिती शासकीय वैद्यकीय  महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे यांनी दिली आहे. कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या जळगावातील एका 63 वर्षीय वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेमुळे जळगाव शहरासह जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. या वृद्धाचा बुधवारी रात्री उशिरा कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा वैद्यकीय अहवाल जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय प्रशासनाला प्राप्त झाला होता. कोरोनामुळे मृत्यू झालेली वृद्ध व्यक्ती जळगाव शहरातील सालारनगर भागातील रहिवासी होती.

त्यांचा फळे विक्रीचा व्यवसाय होता. कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या या वृद्धाला  उच्च रक्तदाब तसेच मधुमेहाचा देखील त्रास होता.