बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Updated :मुंबई , बुधवार, 8 एप्रिल 2020 (12:21 IST)

पोद्दार फाउंडेशनने मानसिक आरोग्याच्या समस्यांमुळे त्रस्त लोकांसाठी भारताचा पहिला विनामूल्य हेल्पलाइन क्रमांक सुरू केला

सर्व प्रमुख आघाडीचे आर्थिक निर्देशक वित्तीय ताणतणावाने झुंजत आहेत, जे कोविड-१९ महामारीचे परिणाम म्हणून पाहिले जात आहे. महामारीमुळे पुनर्प्राप्तीबद्दल असलेली अनिश्चिततेने जगभरातील सर्व नागरिकांची मने भय आणि चिंताने व्यापून टाकली आहे. राष्ट्राची मानसिक तंदुरुस्ती सुधारण्याच्या हेतूने पोद्दार फाउंडेशन, जे ३७ वर्ष जूने फाउंडेशन आहे, त्याने रोटरी क्लबच्या सहकार्याने कोविड -१९ दरम्यान मानसिक आजाराचे निराकरण करण्यासाठी १८००-१२१-०९८० ही सार्वत्रिक हेल्पलाईन क्रमांक सुरू केली आहे.  
 
गरज असताना प्रत्येकासाठी चिंता आणि तणाव यांच्याशी संबंधित तक्रारींवर मदत करण्यासाठी आणि त्यांच्याकडे लक्ष देण्यासाठी ५०० हून अधिक स्वयंसेवक उपलब्ध आहेत, त्यापैकी २०० स्वयंसेवक सक्रियपणे कॉल घेण्यास आणि लोकांना या अनिश्चित काळामध्ये सामना करण्यास मदत करण्यासाठी प्रशिक्षण घेतलेले आहेत. देशात भाषेमध्ये विविधता असल्याने हे स्वयंसेवक गरज असलेल्या लोकांना मदत करण्यासाठी इंग्रजी, हिंदी, मराठी, गुजराती, कोंकणी आणि पंजाबी यासारख्या अनेक भाषांमध्ये अस्खलित आहेत. स्वयंसेवक सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेत उपलब्ध असतात.
 
पुढाकाराबद्दल बोलताना पोद्दार फाउंडेशनच्या व्यवस्थापकीय विश्वस्त सुश्री प्रकृती पोद्दार म्हणाल्या, “भारतातील सर्व राज्य आणि परदेशातील लोकांना मदत होऊ शकेल अशी एक हेल्पलाईन सुरू करणे हे या मागचा विचार होता. देशव्यापी लॉकडाऊनमुळे लोक त्यांचे दैनंदिन कामकाज करण्यात आणि स्वतःला व्यस्त ठेवण्यात असक्षम झाले आहेत. आपल्या नोकरीशी संबंधित असुरक्षितता खूप आहे, उद्योगांवर परिणाम, आपल्या मित्रांना भेटता न येणे, वेतनाच्या अनिश्चिततेमुळे बचतीची योजना आखण्यात असक्षम होणे, इ. स्वयंसेवक, विशेष तज्ञ यांच्या पथकासह भारताला आज भेडसावणाऱ्या उपचारांच्या दरी कमी करणे हे आमचे लक्ष्य आहे. हे रोटरी क्लब, हिंदुजा हॉस्पिटल, मसिना हॉस्पिटल, राउंड ग्लास आणि इतर फाउंडेशन व संस्थांच्या मदतीशिवाय पूर्ण होऊ शकले नसते."