शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: मुंबई , सोमवार, 6 एप्रिल 2020 (07:04 IST)

काही अतिउत्साही लोकांनी फटाके फोडून परिस्थितीचे गांभीर्य घालवले? सोशल मीडियावर टीकेची झोड

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत लोकांनी दारासमोर दिव्यांची उजळण केली. मात्र काही अतिउत्साही लोकांना परिस्थितीचे गांभीर्यच नसल्याचे समोर आले आहे. मुंबईसह काही ठिकाणी चक्क फटाके फोडून उत्सव साजरा केला आहे. त्यामुळे सर्वच स्तरांतून या लोकांवर टिकेची झोड उठत आहे.

कोरोनाने आतापर्यंत ८० लोकांचे बळी घेतले आहेत. ३५७७ लोकांना कोरोनाने पछाडलं आहे. त्यामुळे देशात दहशत पसरली आहे. अशा परिस्थितीतही देश एक आहे, असं सांगण्यासाठी नरेंद्र मोदी यांनी दिवे, मेणबत्ती पेटवण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. या आवाहनाला उत्तम प्रतिसाद मिळाला मात्र काही अतिउत्साही लोकांनी या गंभीर परिस्थितीचीच खिल्ली उडवली आहे.