शनिवार, 30 सप्टेंबर 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 21 नोव्हेंबर 2022 (22:09 IST)

या वक्तव्यामुळे गिरीश महाजन यांच्या मनोवृत्तीचा हलकटपणा दिसून येतो : खडसे

eknath khadse
गिरीश महाजन यांनी राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांच्यावर टीका करताना त्यांनी त्यांचे मानसिक संतुलन बिघडले असल्याची टीका केली आहे. तर एकनाथ खडसे यांच्या मुलाच्या मृत्यूबद्दलही वक्तव्य करुन त्यांनी जुन्या वादाला नव्याने तोंड फोडले आहे. एकनाथ खडसे यांच्या मुलाच्या मृत्यूबद्दलही वक्तव्य करुन त्यांनी जुन्या वादाला नव्याने तोंड फोडले आहे. आता एकनाथ खडसे यांनी त्यांच्यावर पलटवार करत ते म्हणाले की, या वक्तव्यामुळे गिरीश महाजन यांच्या मनोवृत्तीचा हलकटपणा दिसून येत आहे.
 
माझ्या मुलाचा खून झाला की, आत्महत्या हा वाद विनाकारण संशयनिर्माण करण्याचा प्रयत्न गिरीश महाजन यांनी केला असल्याची टीकाही त्यांच्यावर केली आहे. आमच्या मुलाच्या मृत्यूमुळे आम्हालाच वेदना होत आहेत अशी खंतही त्यांनी यावेळी बोलवून दाखवली.