बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 7 सप्टेंबर 2021 (21:45 IST)

अस होणार चिपी विमानतळाचं उद्घाटन

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी ९ ऑक्टोबर २०२१ रोजी चिपी  विमानतळाचं उद्घाटन केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या हस्ते केलं जाणार आहे अशी माहिती दिली आहे. त्या दिवसापासून विमानसेवा सुरू होणार आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिली. सात वर्षे विमानतळ बांधून तयार होतं, असंही त्यांनी यावेळी सांगितलं. तसेच त्या दिवशीचा कार्यक्रमही जाहीर केला. “९ ऑक्टोबरला दुपारी १२.३० वाजचा चिपी विमानतळ वाहतूक सुरू होईल. मी आणि ज्योतिरादित्य सिंधिया विमानाने मुंबईला येऊ आणि तिथून सिंधुदुर्गला जाणार आहोत. मी ज्योतिरादित्य सिंधिया यांना सकाळी भेटलो आणि त्यांच्याकडून विमानतळ उद्घाटनाचा वेळ घेतला आहे”, असं केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सांगितलं.
 
या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कार्यक्रमाला बोलवणार का?, असा प्रश्न उपस्थित पत्रकारांनी विचारला असता ‘मुख्यमंत्री पाहीजेत असं नाही’, असं उत्तर त्यांनी दिलं. “क्रेडीट घेण्याचं प्रश्नच नाही. मी २०१४ सालापर्यंत विमानतळ बांधून पूर्ण केलं. मी स्थानिक नाही का? आम्ही स्थानिक असल्याने आणि विमानतळ बांधल्याने आमचा अधिकार आहे. पर्यटन जिल्हा आम्ही जाहीर केला. कुणी श्रेय लाटण्याचा प्रयत्न करू नये. शिवसेना कोणत्या आधारावर बोलते हे माहिती नाही. मी संबंधित मंत्र्यांशी याबाबत बोललो आहे.”, असं केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सांगितलं. दुसरीकडे शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी यापूर्वी चिपी विमानतळावरून विमानाचं उड्डाण ७ ऑक्टोबरपासून होणार आहे, अशी घोषणा केली होती.