शनिवार, 9 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 6 एप्रिल 2023 (00:25 IST)

भाजपचे आमदार महेश लांडगे यांना 30 लाख रुपयांची खंडणीची मागणी करत जीवे मारण्याची धमकी

facebook
भाजपचे भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्या परिवर्तन हेल्पलाईनवर अज्ञाताने मेसेज पाठवत 30 लाख रुपयांची खंडणी मागितली आहे. न दिल्यास जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. धमकीचा हा मेसेज परिवर्तन हेल्पलाईनवर काम करणाऱ्या एका तरुणाने रात्री 9:30 वाजेच्या सुमारास बघितला. या मेसेज मध्ये लांडगे यांच्याकडून 30 लाख रुपयांची खंडणी देण्याची मागणी करण्यात आली. पैसे दिले नाही तर जीवे मारण्याची धमकी दिली आहे. महेश लांडगे यांनी नागरिकांच्या मदतीसाठी परिवर्तन नावाची हेल्पलाईन सुरु केली आहे. या हेल्पलाईनवर अज्ञाताने मेसेज  पाठवला  या प्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.  
 
 Edited By - Priya Dixit