मंगळवार, 12 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : बुधवार, 5 एप्रिल 2023 (23:37 IST)

उद्धव ठाकरेंनी मला मारण्यासाठी सुपारी दिली, केंद्रीय मंत्री नारायण राणेंचा मोठा आरोप

uddhav narayan rane
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांच्यावर राणे यांची हत्या करण्यासाठी सुपारी देण्याचा खळबळजनक आरोप केला. तसेच कोरोना महामारीच्या काळात औषध खरेदीतील भ्रष्टाचाराला जबाबदार धरले. पत्रकारांशी बोलताना राणे म्हणाले की, ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी कोविड-19 महामारीच्या काळात औषध खरेदीत भ्रष्टाचार केला होता. 2019 ते जून 2022 पर्यंत ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपद भूषवले होते.
 
मला मारण्यासाठी उद्धव ठाकरेंनी सुपारी देण्याचा प्रयत्न केल्याचे राणे म्हणाले. ज्यांना सुपारी देण्यात आली त्यांनी स्वतः फोन करून मला याबाबत माहिती दिली. पण ज्यांना सुपारी देऊ पाहत आहेत ते मला हातही लावू शकत नाहीत, हे उद्धव यांना माहीत नव्हते. यापूर्वी मुख्यमंत्रिपद भूषवताना त्यांनी भ्रष्टाचार केला होता.असे ही नारायण राणे म्हणाले.  
 
 Edited By - Priya Dixit