रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 9 मार्च 2024 (16:13 IST)

वर्धा नदीत बुडून तिघांचा मृत्यू

water death
वर्धा नदीपात्रात अंघोळीला गेलेले पाच तरुण बुडाले या पैकी तिघांचा बुडून मृत्यू झाला तर दोघांना वाचविण्यात यश आले. अनिरुद्ध चाफले, हरी चाफले, आणि संकेत पुंडरिक नगराळे असे मयत झाल्याची नावे आहेत. सदर घटना महाशिवरात्रीच्या संध्याकाळी भद्रावती तालुक्यात माजरीपासून सुमारे चार किलोमीटर अंतरावर पाटाळा येथील वर्धा नदीच्या पात्रात घडली. 

हे पाच तरुण महाशिवरात्रीच्या यात्रेवरून परत येताना वर्धा नदीत अंघोळीसाठी गेले असता खोल पाण्याचा अंदाज न आल्यामुळे ते पाचही बुडू लागले. तर दोघांनी परतणं करून स्वतःचा जीव वाचवला मात्र इतर तिघे पाण्यात बुडाले. ते तिघे विठ्ठलवाडी येथील रहिवासी होते.तिघांचा नदीपात्रात बुडून मृत्यू झाला. तिघांचे मृतदेह सापडले नाही. पोलिसांना घटनेची माहिती मिळतातच त्यांनी नदीपात्रात शोधमोहीम सुरु केली. पोलीस प्रकरणाचा तपास करत आहे.  
 
Edited by - Priya Dixit