शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 3 ऑगस्ट 2021 (09:06 IST)

भीषण अपघातात तिघांचा मृत्यू

मिरज सांगोला मार्गावर मोठा अपघात झाला. एका ओमनी वाहन आणि ट्र्क मध्ये जोरदार धडक झाल्याने तिघांचा दुर्देवी अंत झाला.तर नऊ जण गंभीररीत्या जखमी झाले आहेत.या जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
 
हा अपघात मिरज सांगोला मार्गावर कारंडे वाडी फाट्याजवळ झाल्याचे वृत्त समजले आहे.या अपघातात ओमनी आणि ट्रकची समोरून थडक झाल्याने चालकासह दोन बालचमूंचा अंत झाला आहे.या अपघात गाडीचा अक्षरश: चकनाचूर झाला आहे. वाहन चालक उदनवाडी येथून12 प्रवाशांना घेऊन कर्नाटकाच्या दिशेने जात असताना ओमनी आणि माल वाहतूक ट्र्कची अमोरासमोर जोरदार धडक झाली.या अपघातात चालक आणि दोन बाल चिमुकले कावेरी मनोज हरिजन वय वर्ष 7 आणि गुड्डी चंद्रकांत मगिरी वयवर्षे 8 यांचा जागीच मृत्यू झाला आणि 9 जण गंभीररीत्या जखमी झाले.