गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 3 ऑगस्ट 2021 (08:12 IST)

तृतीयपंथी जगन मामा (राणी जान) यांचे अल्पशा आजाराने निधन

जळगाव शहरातील गोलाणी मार्केट मधील वरिष्ठ तृतीयपंथी राणी सविता जान उर्फ (जगन मामा) यांचे सोमवारी अल्पशा आजाराने निधन झाले. जगन मामा यांच्या निधनाने तृतीयपंथीयांमध्ये मोठी शोककळा पसरली आहे. जळगाव शहरातील तृतीयपंथी समाजातील प्रमुख राणी सविता जान उर्फ (जगन मामा) हे अनेक वर्षांपासून गोलाणी मार्केटमधील चौथ्या मजल्यावर रहिवासी आहे. मागील तीन महिन्यापासून ते आजारी होते.