शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

रक्षाबंधनादिवशी मंदिरावर झेंडा लावताना तिघांचा मृत्यू

Wardha News वर्ध्या येथे घडलेल्या एक दुर्देवी घटनेत मंदिरावर झेंडा चढवताना विजेचा धक्का लागून तीन जणांचा मृत्यू झाला. वर्ध्याच्या पिपरी मेघे गावात आज बुधवारी सकाळी आठ वाजता ही दुर्घटना घडली. 
 
अशोक सावरकर(55), बाळू शेर (60) आणि सुरेश झिले (33) अशी मृत तरुणांची नावे आहेत.
 
सर्वत्र रक्षाबंधन सण साजरा केला जात असताना ही घटना घडली. वर्ध्याच्या पिपरी मेघे गावातील तुळजाभवानी मंदिरावर झेंडा लावण्यासाठी तीन तरुण चढले होते. मंदिरातील झेंड्याचा खांब हा 25 फूट उंचीचा होता. झेंडा वरती चढवत असताना झेंड्याच्या लोखंडी खांबाचा तोल सुटून शेजारी असलेल्या 33 केव्हीच्या विजेच्या तारेवर पडला, ज्यामुळे तिघांनाही विजेचा धक्का लागला आणि तीनही तरुण विद्युत प्रवाहाचा जोरात झटका लागल्याने मंदिराच्या शेडवर पडले. 
 
या दुर्घटनेत एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर दोघांचा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला.