शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 8 सप्टेंबर 2022 (08:51 IST)

बापाचा १७ वर्षीय पोटच्या मुलीवर सलग तीन वर्षांपासून लैंगिक अत्याचार

gang rape
नराधम बापाने १७ वर्षीय पोटच्या मुलीवर सलग तीन वर्षांपासून लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना वर्धा जिल्ह्याच्या अल्लीपूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या बोरगाव आलोडा या गावात घडली.
 
बोरगावात आरोपी बापाने आपल्या पोटच्या १७ वर्षीय मुलीवर सलग तीन वर्षे लैंगिक अत्याचार केला. इतकंच नाही, तर आरोपी मुलीवरील लैंगिक अत्याचाराची माहिती बाहेर जाऊ नये म्हणून पत्नीलाही मारहाण करायचा. मात्र, सततचा अत्याचार असह्य झालेल्या पीडित मुलीने अखेर हा सर्व प्रकार आपल्या शिक्षिकेला सांगितला. त्यामुळे हे धक्कादायक प्रकरण उघडकीस आले.
 
पोलिसांनी आरोपी बापाला अटक केलं आहे. त्याच्याविरोधात पाक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरिक्षक सुनिल गाडे करीत आहेत.