सहलीत अंघोळ करताना कुटुंबीयांसमोर तिघांचा बुडून मृत्यू
नागपूरच्या मटकाझरी तलावावर सहलीसाठी आलेल्या एका कुटुंबातील तिघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. हे कुटुंब सहलीसाठी तिथे आले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, नागपुरातील उमरेड तालुक्यात कुही पोलीस ठाणा हद्दीत शुक्रवारी एका कुटुंबातील 7 सदस्य कारने पाचगाव सुरगाव येथे एका नातेवाईकांच्या शेतात आंबे खाण्यासाठी गेले असता त्यांना शेतातील झाडाला आंबे मिळाले नाही म्हणून ते सर्व जण जवळच्या मटकाझरी तलावाजवळ सहलीसाठी गेले असता त्यातील दोघे जण पाण्यात अंघोळ करण्यासाठी गेले. त्यांच्या पाठोपाठ 12 वर्षाचा मुलगा देखील पाण्यात उतरला
त्यांना पाण्याची खोलीचा अंदाज आला नाही आणि त्यापैकी एक जण बुडू लागला दोघे जण त्याला वाचवायला गेले असता ते देखील पाण्यात बुडू लागले. त्यांना बुडताना पाहून कार चालक ने उडी घेत एकाला पाण्यातून खेचत बाहेर काढले. जितेंद्र इस्तराम शेंडे(35), संतोष किशोर बावणे (25), निषेध राजू पोपट(12)अशी मयतांची नावे आहेत.
ही माहिती पोलिसांना मिळतातच ते गावकऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी गुरुवारी रात्री गोताखोरांच्या मदतीने उशिरा पर्यंत मृतदेह बाहेर काढले. पोलिसांनी या प्रकरणाची आकस्मिक मृत्यूची नोंद करून मृतदेह शव विच्छेदनासाठी पाठविले आहे.
Edited by - Priya Dixit