शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 22 मे 2024 (13:07 IST)

नागपूरमध्ये कुत्र्यांच्या हल्ल्यात तीन वर्षाचा चिमुकल्याचा मृत्यू

नागपूरमध्ये भटक्या कुत्र्यानीं घराच्या बाहेर खेळणाऱ्या एका 3 वर्षाच्या चिमुकल्याचा जीव घेतला आहे. या भटक्या कुत्र्यानीं या चिमुकल्याचा लचके तोडून त्याला ठार केले. या चिमुकल्याचा वडील कामावर गेले होते. व आई आतमध्ये काम करीत होती. 
 
महाराष्ट्रातील नागपुरमध्ये हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. नागपूरमध्ये भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. एक 3 वर्षाचा चिमुकला घराबाहेर खेळात असतांना अचानक कुत्र्यांनी त्याच्यावर हल्ला केला. व त्याचे लचके तोडायला लागले चिमुकल्याचा आवाज ऐकून शेजारील लोक घराबाहेर आलेत व कुत्र्यांच्या तावडीमधून त्या चिमुकल्याचा सुटका केली. व त्याला लागलीच रुग्णालयात नेण्यात आले. पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. ही घटना नागपूरमधील मौदा तहसील परिसरातील गणेश नगर मधील आहे. मृत पावलेल्या चिमुकल्याचा नाव वंश अंकुश शहाणे असे आहे. 
 
मिळालेल्या माहितीनुसार कुत्र्यांनी या चिमुकल्याची मान पकडली व जबड्यात दाबून धरली ज्यामुळे त्याच्या मानेमधील नसा तुटल्या व त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी प्रशासन कोणते पाऊल उचलते हे पाहणे महत्वपूर्ण आहे.