1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आवश्यक माहिती
Written By
Last Modified: बुधवार, 22 मे 2024 (12:13 IST)

1 जूनपासून हे नवीन नियम लागू!

Rules
New RTO Rules 2024 : आजकाल प्रत्येकाला नवीन गाडी घ्यावीशी वाटते. आजच्या काळात बाईक पासून ते कार चालवणे सामान्य गोष्ट झाली आहे. प्रत्येक जण आपल्या आवडीनुसार किंवा गरजेनुसार स्कुटी, बाईक, कार चालवतात. पण तुम्हाला माहित आहे का 1 जून पासून नवीन नियम लागू होणार आहेत. या नियमांचे उल्लंघन केल्यास मोठा दंड भरावा लागू शकतो. यासोबतच तुमची समस्या वाढू शकते. 
 
तसेच या करिता तुम्हाला परिवहन आणि ड्राइव्हिंग लाइसेंस बद्दल पूर्ण माहिती असणे गरजेचे आहे. चला जाणून घेऊ या नियम.
 
सरकारी क्षेत्रीय परिवहन कार्यालय (RTO) 1 जून 2024 पासून वाहन नवीन नियम लागू करित आहे. या नियमांनुसार 18 वर्षाच्या खालील तर जलद गतीने वाहन चालवणाऱ्या लोकांना कमीतकमी 25 हजार दंड भरावा लागेल. 

तसेच विना लाइसेंस वाहन चालवल्यास 500 रुपये दंड भरावा लागेल. हेल्मेट घातले नाही तर 100 रुपये दंड, सीट बेल्ट लावला नाही तर 100 रुपये दंड भरावा लागेल. तसेच 18 जे वर्षाखालील असतील त्यांचे लाइसेंस रद्द करण्यात येणार आहे. तर 25 वय वर्षापर्यंत लाइसेंस मिळणार नाही. तसेच इतर काही नियमांचे उल्लंघन केल्यास दंड भरावा लागेल. 
 
ड्राइविंग लाइसेंससाठी RTO जाऊन टेस्ट देणे गरजेचे नाही 
जर तुम्ही ड्राइविंग लाइसेंस घेण्याचा विचार करीत असाल तर तसेच RTO मध्ये जाऊन टेस्ट देण्यासाठी घाबरत असाल तर आनंदाची बातमी आहे तुमच्यासाठी, सरकार आता या प्रक्रियेला सोप्पे करत आहे. समजा तुम्हाला ड्राइव्हिंग शिकायची आहे आणि तुम्हाला ड्राइविंग लाइसेंस घ्यायचे आहे. तर तुम्हाला आता RTO मध्ये जाऊन टेस्ट द्यायची गरज नाही. तर 1 जून पासून सरकार व्दारा मान्यता प्राप्त विशेष खाजगी संस्थानामध्ये ड्राइव्हिंग टेस्ट देऊ शकतात. जर तुम्हाला ड्राइविंग लाइसेंस हवे असेल तर नवीन पर्याय निवडू शकतात. यामुळे ड्राइविंग लाइसेंस बनवण्याचा प्रवास थोडा सोपा होईल. 

Edited By- Dhanashri Naik