जळगावच्या बांभोरी पुलावर कार आणि कंटेनर यांच्यात भीषण धडक! तीन तरुणांचा जागीच मृत्यू
जळगावच्या बांभोरी पुलावर कार आणि कंटेनर यांच्यात झालेल्या भीषण धडकेत तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये पंकज प्रकाश चौधरी, हरीश हिम्मत चौधरी आणि रवींद्र अरुण चौधरी यांचा समावेश आहे. ते धरणगाव तालुक्यातील झुरखेडे गावचे रहिवासी होते आणि नातेवाईक होते.
मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील जळगाव येथील बांभोरी उड्डाणपुलावर कार आणि कंटेनर यांच्यात झालेल्या भीषण अपघातात तीन तरुणांचा मृत्यू झाला. हे तरुण जळगावहून धरणगाव तालुक्यातील त्यांच्या झुरखेडे गावी जात असताना समोरून येणाऱ्या एका कंटेनरने त्यांच्या कारला धडक दिली. अपघातात ठार झालेले तिन्ही तरुण नातेवाईक होते. हा भीषण अपघात रविवारी रात्री सुमारे साडेनऊ वाजता घडला. देवी यात्रा सुरू झाल्यामुळे हे तरुण भुसावळजवळील वनोली येथे एका नातेवाईकाला सोडण्यासाठी गेले होते. आपले काम पूर्ण झाल्यावर ते जळगावच्या दिशेने निघाले आणि धरणगाव तालुक्यातील त्यांच्या झुरखेडे या गावी परत येत होते. बांभोरी पुलावर समोरून येणाऱ्या एका कंटेनरने त्यांच्या गाडीला धडक दिली. अपघात इतका भीषण होता की गाडीचे चक्काचूर झाले. व अपघात तिघ तरुणांचा जागीच मृत्यू झाला.

