ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात शेतात काम करणाऱ्या महिलेवर वाघाचा हल्ला; मृत्यू
चंद्रपूरमधील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प क्षेत्रातील अगरझरी येथे शेतात काम करणाऱ्या ६० वर्षीय मंदाबाई मंगम यांच्यावर वाघाने हल्ला केला. महिलेचा जागीच मृत्यू झाला.
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या मोहरली वनक्षेत्रातील अगरझरी तलाव परिसरात सोमवारी दुपारी वाघाच्या हल्ल्यात एका ६० वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. तलावाजवळील शेतात खताच्या पिशव्या धुवत असताना वाघ अचानक समोर आला आणि त्याने महिलेवर हल्ला केला. हल्ल्यानंतर वाघाने तिला काही अंतरापर्यंत फरफटत नेले.
या घटनेमुळे अगरझरी आणि आसपासच्या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मृत महिलेची ओळख अगरझरीच्या रहिवासी मंदाबाई सूर्यभान मंगम (६०) अशी पटली आहे.
वन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मंदाबाई सोमवारी दुपारी अगरझरी तलावाजवळील शेतात काम करत होत्या. त्याचवेळी तलावाच्या दिशेने अचानक एक वाघ आला आणि त्याने त्या महिलेवर हल्ला केला. गावकरी घटनास्थळी धावून आले.
हल्ल्यात त्या महिलेचा जागीच मृत्यू झाला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वन विभागाचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी गावकऱ्यांना घटनास्थळापासून सुरक्षित अंतरावर हलवले. वन विभागाच्या पथकाने परिसराची पाहणी करून आवश्यक कारवाई सुरू केली.