गुरूवार, 14 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 4 डिसेंबर 2021 (14:53 IST)

अश्‍लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तरूणीवर अत्याचार

Torture of a young woman threatening to make a pornographic photo viral
लग्नाचे अमिष दाखवून तसेच अश्‍लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तरूणीवर वेळोवेळी अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे.
याप्रकरणी औरंगाबाद येथील तरूणीने एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून रोहिदास भागचंद पालवे (रा. कोल्हूबाई कोल्हार ता. पाथर्डी) या तरूणाविरूद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची घटना 2 जून 2021 व त्यानंतर वेळोवेळी जेऊर (ता. नगर) परिसरातील एका हॉटेलमध्ये घडली. रोहिदास पालवे याने फिर्यादी तरूणीला लग्नाचे अमिष दाखविले होते.
रोहिदास याने फिर्यादी सोबत तीच्या इच्छेविरूद्ध वेळोवेळी शारीरीक संबंध ठेवले. तसेच रोहिदास याने फिर्यादीस तुझे अश्लील फोटो काढून ते व्हायरल करण्याची धमकी दिली.सदरची घटना जर कोणाला सांगितली तर तुला जीवे ठार मारून टाकीन अशीही धमकी दिली असल्याचे पिडीत तरूणीने फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विनोद जाधोर करीत आहे.