गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 14 मार्च 2022 (16:19 IST)

3 शाळकरी मुलांचा बुडून दुर्देवी मृत्यू

जुन्नर तालुक्यात निमगाव सावा येथील 3 शाळकरी मुलांचा पाण्यात बुडून दुर्देवी मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना रविवारी घडली असून या घटनेमुळे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. साहिल रंगनाथ घोडे(14),मयूर रामदास घोडे(10),आणि आनंद विजय खाडे(11) असे या मयत झालेल्या मुलांची नावे आहेत.अशी माहिती नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षकांनी दिली. 
 
रविवारी शाळेची सुट्टी असल्यामुळे निमगाव सावा येथील हे तिघे ओढ्यावर बंधाऱ्यावर पोहण्यासाठी सायकलवरून गेले होते. संध्याकाळी देखील ते परत आले नाही त्यामुळे कुटुंबीयांनी त्यांचा शोध घेतला. बंधाऱ्याच्या कडेला त्यांचे कपडे आणि चपला दिसल्या. ते पोहण्यासाठी गेल्याचा अंदाज वर्तवला. बऱ्याच वेळ झाल्यावर ते पाण्यातून बाहेर आले नाही म्हणून काही स्थानिक लोकांनी त्यांचा शोध घेतला असता ते पाण्यात बुडाले होते. त्यांना पाण्यातून बाहेर काढल्यावर ते मृतावस्थेत आढळले. या घटनेमुळे सर्वत्र शोककळा पसरली आहे.