गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 16 डिसेंबर 2022 (08:42 IST)

राज्यातील काही सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

राज्य सरकारनेकाही सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. त्यात तीन अधिकाऱ्यांचा समावेश आहे. नागपूर स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी चिन्मय गोतमारे (IAS :AM- 2009) यांची गोंदियाचे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. गोंदियाच्या जिल्हाधिकारी श्रीमती नयना अर्जुन गुंडे (IAS-2010) यांना आदिवासी आयुक्त, नाशिक म्हणून जबाबादारी देण्यात आली आहे. तर, आदिवासी विकास आयुक्त हिरालाल सोनवणे (IAS-2010) यांची दुग्धविकास आयुक्त, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

Edited By-Ratnadeep Ranshoor