मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 1 डिसेंबर 2022 (21:15 IST)

डम्परने वाळू वाहतुकीवर बंदी येणार

प्रशासकीय स्तरावरचे वाळू लिलाव प्रक्रिया होणार नसून वाळू बाबत शासन स्तरावर लवकरच नवीन धोरणाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी स्तरावर समितीची नियुक्ती करण्यात येईल. नव्या धोरणानुसार, डम्परने वाळू वाहतुकीवर बंदी येणार असल्याची माहिती राज्याचे महसूल आणि पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे.विभागीय आयुक्त कार्यालयाच्या नियोजन सभागृहात नाशिक विभागातील महसूल यंत्रणेच्या कामकाजाचा आढावा आणि लम्पी स्कीन आजाराबाबतच्या सद्य:स्थिती बाबतचा आढावा महसूल व पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतला, त्यावेळी ते बोलत होते.
 
विखे पाटील म्हणाले, सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी अनाधिकृत दगडखणी बंद करुन दंडात्मक कारवाई करावी. इटीएस मशिनद्वारे सर्व दगड खाण्याचे मोजणी करावी. तसेच अनधिकृत गौण खनिजाचे वाहतुकीला आळा बसण्यासाठी sop तयार करण्याची सूचना विखे पाटील यांनी केली आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor